September 19, 2025 8:26 am

दहाव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून प्रवरा मेडिकल ट्रस्टचे प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय लोणी याचेवतीने सर्व रोग निदान शिबीर संपन्न

अहिल्यानगर मराठी न्यूज संपादक शहाजी दिघे

सोनगाव प्रतिनिधी (अनिल वाकचौरे) : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील दहाव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आदरणीय डॉ. राजेंद्रजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय लोणी तसेच सात्रळ ग्रामपंचायत, तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सात्रळ येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत सर्व रोग निदान व आयुर्वेद उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये एकूण २१६ रुग्णांची मोफत रुग्ण तपासणी व उपचार, औषध वितरण, आहार विषयक सल्ला तसेच योग व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले .

शिबिराच्या यशस्वी आयोजन करता प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आयुर्वेद रुग्णालय लोणी व ग्रामपंचायत सात्रळ येथील सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी 

 

सात्रळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच रमेश पन्हाळे, पदमश्री विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक जे. पी.जोर्वेकर (आण्णा), पंचायत समिती माजी सदस्य वसंत डुक्रे पा द्वारकामाई फाउंडेशन चे सदस्य कडू पा निधाने पा.अजित जोर्वेकर पत्रकार अनिल वाघचौरे हे उपस्थित होते.

डॉक्टर गणेश आहेर यांनी आयुर्वेदाचे महत्व सांगून रोग निदान व आयुर्वेद उपचार शिबिर कार्यक्रमाची माहिती विषद केली.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें