अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
कोपरगाव मतदारसंघात सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ होणार साजरा
कोपरगाव प्रतिनिधी ( प्रशांत टेके ) : १७ सप्टेंबर विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत राघेवश्वर मंदिर कुंभारी येथे मंदिर स्वच्छता आणि वैचारिक मंथनाने साजरा करण्यात आला.सेवा परमो धर्म मंत्र उच्चारत पंतप्रधानांनी गरीब, शोषित, वंचित यांच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून प्रशंसनीय कार्य केले आहे.हा वाढदिवस सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करीत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा कोल्हे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह दिल्या आहेत.
१७ सप्टेंबर नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते २ ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत सेवा पंधरवाडा म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा होण्यास सुरुवात झाली आहे.स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पंतप्रधानाच्या जीवनावर आधारित जीवनपट फिल्म प्रकाशन, प्रबुद्ध नागरिक संवाद, दिव्यांग व अन्य प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान, वोकल फॉर लोकलचा प्रसार, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, मोदी विकास मॅरेथॉन, पंडित दीनदयाल जयंती, गांधी जयंती असे लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित केले आहे.सर्वांनी यात सहभागी होऊन नरेंद्र मोदी दीर्घायुष्य लाभावे, म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी उपक्रम आयोजित करून शुभेच्छा देणार आहोत असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.
मोदीजींनी २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरू करून देशाला स्वच्छतेच्या दिशेने एक नवा मार्ग दाखवला. या अभियानात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. एक हातात झाडू घेणं म्हणजे केवळ कचरा साफ करणं नाही, तर देशासाठी योगदान देणं आहे.चला, मोदीजींच्या वाढदिवसाला एक सामाजिक भेट देऊ,स्वच्छतेची शपथ घेऊन, आपल्या परिसराला स्वच्छ आणि सुंदर बनवूया असे आवाहन करण्यात आले.कोपरगाव विधानसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये स्वच्छता अभियान भाजपा पदाधिकारी यांच्याकडून राबवण्यात आला