अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
शिर्डी दि.२१ प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकराने वस्तू सेवा कर कमी करून सुरू केलेल्या नव्या बचत पर्वाचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले असून, नवी कर प्रणाली जाहीर करून नागरीकांना दिलेली भेट देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भरतेनअधिक बळकट करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून वस्तू सेवा कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता.नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर याची अंमलबजावणी करण्याच्या झालेल्या निर्णयाचे स्वागत करून मंत्री विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि अर्थ मंत्री निर्मला सीतारामन् यांचे आभार मानले आहेत.
केंद्र सरकारच्या धोरणामुळे अर्थिक दृष्ट्या देश सक्षम होत आहे.यापुर्वी ‘एक राष्ट्र एक कर’ याची सुरूवात केंद्र सरकारने केली.आता विकसित भारताच्या सर्व निर्णय प्रक्रीयेत देशातील सामान्य माणसाचे प्रतिबिंब असावे या उद्देशाने वस्तू सेवा कर प्रणालीतील बदल करण्याच्य निर्णयाची सुरू झालेली कार्यवाही देशातील सामान्य माणसाला दिलासा देणारी ठरेल.
नव्या कर प्रणालीचा देशातील नागरीक, शेतकरी, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक महीला आणि युवकांना मोठा आधार मिळेल.कर प्रणालीतील व्यापक सुधारणामुळे नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईलच परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे लघु उद्योजक,छोट्या व्यापारी वर्गासाठी व्यवसाय प्रक्रीया अधिक सुलभ करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे उद्दीष्ट्य पूर्ण करताना देशाची अर्थव्यवस्था सुध्दा आत्मनिर्भरतेने पुढे जाण्यास केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहसिक ठरणार असल्याचे मंत्री विखे म्हणाले.