अहिल्यानगर :शहाजी दिघे
अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ ग्रामीण आणि एक नागरी तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
अहिल्यानगर येथे नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठकीला हजर होते. या वेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ ग्रामीण आणि एक नागरी तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आल्याचे सांगण्यात आले.त्यात श्रीदत्त महाराज देवस्थान चैतन्य कानिफनाथ (शिप्रागिरी महाराज समाधी) देवस्थान ट्रस्ट, निळवंडे (ता. संगमनेर), श्रीक्षेत्र भैरवनाथ देवस्थान, पुणेवाडी (ता. पारनेर), श्रीसिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान, गळनिंब (ता. श्रीरामपूर), श्रीसद्गुरू धर्मराज देव मंदिर, तांदळी वडगांव (ता. नगर), श्रीचैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान मांचीहिल, आश्वी बु. (ता. संगमनेर), श्रीमहालक्ष्मी, मारुती मंदिर देवस्थान,टाकळी (ता. अकोले), श्रीविठ्ठल देवस्थान ट्रष्ट, मेहेंदुरी (ता. अकोले), श्रीमहादेव मंदिर देवस्थान, डाऊच खुर्द (ता. कोपरगाव), श्रीमहादेव मंदिर देवस्थान, सडे (ता. कोपरगाव), श्रीराजा विरभद्र देवस्थान, भोजडे (ता. कोपरगाव) या ग्रामीण भागातील, तर श्रीविरभद्र देवस्थान, श्रीनवनाथ महाराज मंदिर इ. देवस्थान राहाता शहर (ता. राहाता),श्रीजगदंबा माता मंदिर अस्तगाव (ता. राहता), श्रीसिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान गळनिंब (ता. श्रीरामपूर), श्रीभैरवनाथ देवस्थान मिरजगाव कर्जत या शहरी तीर्थक्षेत्राचा यात समावेश आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३०० अंगणवाड्यांचे बांधकाम, ३०० जलस्रोतातील गाळ काढणे, ३०० गावे अतिक्रमणमुक्त करणे, पुरातन बारवांची दुरुस्ती, कन्या विद्यालयात सीसीटिव्ही बसविणे आदी कामे करण्यात येणार आहे.