राहुरी :शहाजी दिघे
राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते आमदार शिवाजी कर्डिले निवडून आल्यानंतर नुकतीच त्यांची मणक्याच्या आजारामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली .
तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे . नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची रुग्णालयात जाऊन भेट देऊन तब्येतीची काळजी घेण्याचे घेण्याचा सल्ला दिला
दरम्यान , राहुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची अडचण होऊ नये म्हूणन .आमदार कर्डिले यांचे पुत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा नेते अक्षय कर्डिले यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघात आपला संपर्क सुरू ठेवला आहे
मागील आठवड्यात राहुरीतील पूजनीय अण्णासाहेब मोरे यांच्या महा सत्संग मध्ये सहभाग घेतला होता , त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा तालुक्यातील संपर्क चर्चेत आला होता .
नुकताच अक्षय कर्डिले यांनी आता मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी जनता दरबार घेत त्यात नागरिकांच्या गाठीभेटी व विविध प्रश्नांबाबत लक्ष देण्याबाबतच्या चर्चांना चांगल्याच जोर धरू लागल्या असून अक्षय कर्डिले यांनी यानिमित्ताने राहुरी विधानसभा मतदारसंघात जनसंपर्कमध्ये आपली पकड घट्ट करण्याचे दिसून येत आहे . भारतीय जनता पक्षाचे युवा नेता अक्षय कर्डिले यांच्या जनता दरबाराची सध्या विधानसभा मतदारसंघातील राहुरी नगर पाथर्डी तालुक्यात चर्चा सुरू आहे .