September 11, 2025 8:39 am

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्यास थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

 

अहिल्यानगर :प्रतिनिधी 

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यात येत असतात. फेब्रुवारी-मार्च २०२५ ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

इयत्ता १२ वी आणि १० वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त तसेच निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. यावर्षी होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णत: प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल.

परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल.

परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित घटकांची Facial Recognition System द्वारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल.

Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे.

 

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें