September 11, 2025 1:24 pm

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या

श्रीरामपूर :अतुल देसर्डा 

श्रीरामपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण नेहमी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. याच माध्यमातून राज्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना बरोबर घेत कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांच्या माध्यमातून लोणी येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे ना. विखे पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, प्रकाश चित्ते, डॉ.शंकर मुठे, नानासाहेब पवार,अभिषेक खंडागळे, शरद नवले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे म्हणाले की,मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक कार्यकर्ते पक्षत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. पक्षाचे सुरू असलेले सदस्य नोंदणी अभियान त्याचे द्योतक आहे. जिल्ह्यातही सदस्य नोंदणीस प्रतिसाद मिळत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही पक्षाचे कार्य वेगाने पुढे चालले आहे.

ही प्रक्रिया येत्या काळात आपल्याला अधिक गतिमान करून कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कमालपूर येथील अशोक गोरे, रावसाहेब मुरकुटे, दत्तात्रय शेळके, दिगंबर गोरे, आप्पासाहेब दवंगे, रवींद्र मुरकुटे, विजय दवंगे, दादासाहेब दवंगे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें