September 11, 2025 8:36 am

राम मंदिराचे मुख्य पूजारी मंहत सत्येंद्र दास यांचे निधन

अहिल्यानगर :शहाजी दिघे 

अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे आज बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी सकाळी आठ वाजता निधन झाले. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्ट्रोकचा झटका आल्यामुळे ३ फेब्रुवारी रोजी त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात आणण्यात आले.

मंगळवारी (११ फेब्रुवारी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानी लखनऊमधील रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली होती. सत्येंद्र दास गेल्या काही काळापासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा सामना करत होते.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचा ढाचा कोसळण्याच्या आधीपासून आचार्य सत्येंद्र दास राम मंदिरात पुजारी म्हणून काम करत होते. नऊ महिन्यांपूर्वी जेव्हा राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा पदाचा ताबा घेतला होता.

निर्वाणी आखाड्याचे सदस्य असलेल्या सत्येंद्र दास यांनी वयाच्या २० वर्षी आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली होती.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें