September 11, 2025 8:32 am

६७वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न 

अहिल्यानगर : शहाजी दिघे 

अहिल्यानगर : महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीने आयोजित ६७वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार संग्राम जगताप व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला 

यावेळी महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ यांना महिंद्रा थार गाडी भेट देण्यात आली तर इतर विजेत्या पैलवानांना बुलेट, स्प्लेंडर व सोन्याची अंगठी देऊन सन्मानित करण्यात आले.

अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली याचा आयोजक म्हणून आनंद आहे. राज्यभरातून आलेल्या पैलवानांच्या रोमहर्षक लढतीचा कुस्तीचा कुस्तीप्रेमींना आस्वाद घेता आला.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला असून त्यांनी आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. राज्यभरातून आलेल्या पैलवानांची काळजी घेण्याचे काम कुस्तीगीर संघाने केले आणि सर्व कुस्त्या यशस्वी संपन्न झाल्या. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या व्हावेत अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचा उपाध्यक्ष या नात्याने मी करतो. जिद्द, चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असते. भविष्यात नगर शहरामध्ये हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल घडावे यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे केले जाणार आहेत. कुस्ती खेळाच्या माध्यमातून प्रेरणा मिळत असते. त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नसतात, प्रेक्षकही चांगले विचार घेत असतात. मोहोळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते. कुस्तीचा हा सर्वोच्च सन्मान आहे.

यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, पै. महेंद्र गायकवाड, हिंदकेसरी योगेश दोडके, राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा. माणिकराव विधाते, मार्गदर्शक विलास कथोरे, पै. गुलाब बर्डे, बबन काशीद, अनिल गुंजाळ, संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण, शिवाजी कराळे, निखिल वारे, उद्योजक राजेश भंडारी, गणेश गुंडाळ, सत्यम गुंदेचा, सुरेश बनसोडे, काका शेळके, अजय चितळे, युवराज पठारे, संजय ढोणे, देवा शेळके, युवराज करंजुले, निलेश मदने, बाळासाहेब जगताप, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, मनीष साठे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें