सोनगाव :शहाजी दिघे
सोनगाव : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील रसायनशास्त्र विभाग व रीलायबल श्री इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एम. एसस्सी. च्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्ट्रुमेंट हॅन्डलिंगचे पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एन. शिंगोटे यांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंगोटे यांच्या हस्ते करण्यात आला . रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अमित वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच सदर प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला. सदर कार्यशाळेमध्ये शैक्षणिक व संशोधनास उपयुक्त व नावीन्यपूर्ण उपकरणांची हाताळणी करण्यात आली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थांच्या संशोधन कार्य व औषधी कंपन्यामध्ये नोकरी मिळण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंगोटे सर यांनी केले.
कार्यक्रमासाठी रीलायबल इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटरचे प्रशिक्षक श्री. अनिल विसपुते व त्यांचे सहकारी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रो. डॉ. एस. एस. पंडित, सौ. सी. एस. कार्ले व रसायनशास्त्र विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. जी. दिघे यांनी केले. आभार पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. व्ही. ए. कडनोर यांनी केले.