पारनेर :प्रतिनिधी
पारनेर : कुकडी डावा कालव्यातून रविवारी दुपारी पाणी सोडण्यात आले असून पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी पोहचले आहे. या आवर्तनामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ प्रश्न मार्गी लावल्याने निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.
कुकडी कालव्याच्या लाभ क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे चारा पिके, फळबाग, इतर शेतीमाल जळण्याची भीती निर्माण झाली होती यामुळे आमदार काशिनाथ दाते सर यांनी ठरलेल्या आवर्तनाच्या पाच दिवस अगोदर पाणी सोडावे अशी आग्रही मागणी आमदार काशिनाथ दाते सर यांनी शेतकऱ्यांचे मागणी प्रमाणे कार्यवाही व्हावी म्हणून जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या पाठपुरावाला यश आले आहे.
आमदार दाते सर यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी तात्काळ कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांना आवर्तन सोडण्याचा आदेश त्यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी ( दि १६ ) रोजी आवर्तन सोडण्यात आले आहे.
शेतकर्यांना या आवर्तनाचा गरजेच्या वेळी सुटलेले असून अगोदर आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.