सोनगाव : शहाजी दिघे
सोनगाव : सोनगाव ग्रामस्थांच्यावतीने आज रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी सकाळी संत शिरोमणी सावता महाराज सप्ताह नियोजन व श्रीराम मंदिर अध्यक्ष निवडीबद्दल श्रीराम मंदिर
सोनगाव या ठिकाणी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये श्रीराम मंदिरासाठी योगदान असणाऱ्यांनी अध्यक्ष व्हावे अशी सूचना मांडली त्या अनुषंगाने कै भानुदास दादा पाटील अंत्रे आणि लक्ष्मण गोविंदराव अंत्रे यांचे मोलाचे योगदान असल्याचे सर्वांनुमते सिद्ध झाले म्हणून
श्रीराम मंदिराचे अध्यक्षपदी एकमताने श्री लक्ष्मण गोविंदराव अंत्रे पाटील यांची निवड करण्यात आली तसेच संत शिरोमणी सावता महाराज यांच्या होणाऱ्या वार्षिक सप्ताहाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कृषिरत्न डॉ सुभाषराव शिवाजी शिंदे यांची सर्वानुमते सप्ताहाच्या अध्यक्षपदासाठी
निवड करण्यात आली दोन्ही अध्यक्षपदासाठीची सूचना व्हाईस चेअरमन श्री नारायण धनवट यांनी मांडली संतोष पाटील व एकनाथ शिंदे यांनी त्यांना अनुमोदन दिले याप्रसंगी ज्येष्ठ संचालक सुभाष मामा अंत्रे माजी संचालक सुभाष नामदेव पाटील अंत्रे माजी संचालक पाराजी मोहन धनवट सर संत सावता महाराज मंदिराचे अध्यक्ष माजी सरपंच
अशोकराव अंत्रे पाटील उपाध्यक्ष एकनाथ शिंदे दिलीप बाबा प्रवरा बँक संचालक संतोष पाटील हरकूदास सर विलास शिंदे सर भगवान पर्वत सर भिकाभाऊ धनवट,अनिल अंत्रे तंटामुक्ती अध्यक्ष
भाऊसाहेब पाटील चंद्रकांत गुरुजी प्रकाश कानडे माजी उपसरपंच किरण पाटील अंत्रे माजी सरपंच बाळू पाटील अंत्रे योगेश अंत्रे सदस्य विनोद अंत्रे ह भ प विठ्ठल भिकाजी अंत्रे भगवानजी पांडे दत्तू प्रधान विठ्ठल शिंदे हे व इतर मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी निवड झालेल्या दोन्हीही अध्यक्षांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा समारोप मुळा प्रवरा संचालक माजी अध्यक्ष मच्छिंद्र पाटील अंत्रे यांनी केला.