September 21, 2025 9:50 am

नाशिक कुंभमेळा नियोजनात किकवी धरणाचे काम मार्गी लावावे- स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव : प्रशांत टेके 

नाशिकचा कुंभमेळा २०२७ मध्ये आहे, त्याच्या नियोजनाची तयारी सध्या सुरू आहे, उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे. कुंभमेळयानिमीत्त लाखो भाविक, श्रध्दाळु नाशिक येथे जमा होत असतात त्याधर्तीवर किकवी धरणाचे काम मार्गी लावुन पाण्याची तुट भरून काढावी अशी मागणी मा. आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, नाशिक शहरासह लोकसंख्या व औद्योगिकीकरणांत प्रचंड वाढ होत आहे त्याच्या बिगर सिंचन पाण्याचा ताण दारणा गंगापूर धरणांवर पडत आहे. उर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे असुन त्यात पाण्याची वाढ केल्याशिवाय त्याचे वाटप होवु शकत नाही, त्यासाठी दुस-या जलसिंचन आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष माधवराव चितळे यांनी शासनस्तरावर अहवाल सादर करून जास्तीचे पाणी कसे मिळवायचे याबाबत निर्देश दिले आहे.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी निर्माण करण्यासाठी पश्चिमेचे अतिरिक्त समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या कामांस सन २००० मध्ये विधीमंडळात मंजुरी घेवुन ठेवली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सर्व सहकारी मंत्री महोदयांनी गती देवुन मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत बहुतांष वळण योजनांना मंजुरी देवुन धडक काम हाती घेतले आहे.
नाशिक शहरीकरणांचा वेग प्रचंड वाढतो आहे त्यामुळे पिण्यांचे पाण्याची मागणीही वाढत आहे, गंगापुर धरणांतुन त्यांना पिण्यासाठी पाणी दिले जाते मात्र त्यात मोठ्या प्रमाणांत गाळ साठल्याने त्याचा ताण अन्य धरणांवर पडत आहे, त्यासाठी किकवी धरण प्रस्तावीत करण्यांत आलेले आहे., माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी या कामाचा मोठ्या प्रमाणांत पाठपुरावा करून नाशिक अहिल्यानगर विरुध्द मराठवाडा या प्रादेशिक पाणी वादात आवश्यक जलसंपदा प्रकल्पांना मंजुरी मिळविली व जलसंपदा खात्यामार्फत हे सर्व प्रकल्प मार्गी लागावे म्हणून सातत्याने शासनदरबारी प्रयत्न देखील केलेले आहेत.
सन २०२७ च्या नाशिक कुंभमेळयाचे नियोजन सध्या सुरू आहे त्याअंतर्गत या किकवी धरण प्रकल्पाचे काम मार्गी लावुन ते युध्दपातळीवर पुर्ण झाले तर दारणा गंगापुर सह अन्य धरणांवरील बिगर सिंचन पाण्यांचा भार काही प्रमाणांत हलका होईल व शेती सिंचनासाठीही पुरेशा प्रमाणांत पाणी उपलब्ध होईल., तेंव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किकवी धरण प्रकल्पाच्या प्रश्नांत तातडीने लक्ष देवुन हा प्रकल्प मार्गी लावावा असेही सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मागणी केली.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा