प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक
कोपरगाव :आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशन कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाचा समारोप शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाला.
या अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेतील पत्रकार सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. पत्रकारितेच्या गुणवत्ता वृद्धीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत ख्यातनाम व्याख्याते आणि मीडिया तज्ज्ञांनी आपले अनुभव, विचार आणि मार्गदर्शन दिले.
कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना बातम्यांचे सादरीकरण, तथ्य तपासणी, मांडणी कौशल्य याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली. विविध सत्रांमध्ये माध्यम सक्षमीकरण, उत्तरदायित्व आणि जनहित पत्रकारितेचे भान देणाऱ्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
समारोपप्रसंगी बोलताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले की, “पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती व ज्वलंत प्रश्न शासन व प्रशासनासमोर आणण्याचे कार्य निःपक्षपातीपणे करावे. शासन-प्रशासनापर्यंत जनतेच्या प्रश्नांचा आवाज पोहोचवणे हेच पत्रकारांचे खरे कर्तव्य आहे.” त्यांनी सामाजिक प्रश्नांवर पत्रकारांनी संवेदनशीलतेने लक्ष केंद्रित करावे आणि उपेक्षितांचा आवाज बुलंद करावा, असेही स्पष्ट केले.
यावेळी खासदार वाकचौरे यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर संसदेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली आणि पत्रकारांच्या कार्यासाठी आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही जाहीर केले. व्हॉइस ऑफ मीडिया नॅशनल फोरमचे गगन महोत्रा, पुणे दैनिक पुढारी संपादक सुनील माळी,प्रा. अरुण लेले, जेष्ठ महिला पत्रकार स्मिता गुणे, घनश्याम पाटील, जयवंत पारधी गुरूजी, संदीप वाकचौरे तसेच क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर आदींचे पत्रकारांसाठी प्रेरणादायी व्याख्याने झाली. तसेच आत्मा मालिक हॉस्पिटल व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांना मोफत आरोग्य सुविधा देणार आहे अशी ग्वाही आत्मा मालिक हॉस्पिटलचे व्यवस्थापक सुनील पोकळे यांनी दिली .
या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, युवा उद्योजक गिरीश मालपाणी, आत्मा मालिक ट्रस्ट अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी,मॅनेजर सुनील पोकळे,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, आरोग्य सेलचे भिमेश मुथुला, महिला प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे आणि रश्मी मारवाडी, वैशाली पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोरख नेहे तसेच वसंतदादा मल्टिस्टेटचे चेअरमन मुकुंद सिनगर, आदी सह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष प्रशांत टेके पाटील व जेष्ठ मार्गदर्शक डॉ. तानाजी मामा लामखडे, संघटक नामदेव कोळपे, सचिव बापू घुमरे, सह संघटक आप्पासाहेब राहाणे,सह संघटक प्रल्हाद मेहेरे आदीसह कार्यकारिणीतील इतर सदस्यांनी सुयोग्य नियोजन केले .अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्ष मदने यांनी सुत्र संचालन केले आणि कोपरगाव तालुका उपाध्यक्ष सुमीत दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.