अहिल्यानगर मराठी न्युज :शहाजी दिघे
धानोरे: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयएसओ मानांकन प्राप्त नवोपक्रमशील आदर्श शाळादिघेवस्ती (धानोरे) येथे विविध योगासनांनी सजलेला कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
शाळेतील २२० विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गाने ही सक्रिय सहभाग नोंदवला तसेच पालकवर्ग ही या ठिकाणी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय योग प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर शरीर शिथिल करणाऱ्या पूरक हालचाली कंबर,मान, हात पाय व खांद्यांचे व्यायाम करून घेण्यात आले .यानंतर विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, मकरासन, भुजंगासन, हलासन पवन मुक्तासन व शवासन यासारखी विविध आसने केली. प्राणायामाच्या सत्रात अनुलोम-विलोम व भ्रामरी या प्रकारांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्याचबरोबर सूर्यनमस्काराचेही ही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनीही योगासने व प्राणायाम ,सूर्यनमस्कार मोठ्या उत्साहाने केले.
योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी असून त्याचे आरोग्यावर होणारे फायदे तसेच मन, शरीर आणि विचार यामध्ये समतोल साधण्यासाठी योगाचा प्रभाव यावर प्रकाश टाकण्यात आला.
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर शिंदे श्री .राजेंद्र बोकंद, श्रीमती विद्याताई उदावंत, श्रीमती सुनिता ताजणे, श्रीमती मनिषा शिंदे आणि श्री. सोमनाथ अनाप यांनी स्वतः योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कार सादर करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही प्रचंड उत्साहाने सहभाग घेत योगासनाचे महत्त्व आत्मसात केले. योग साधनेने भरलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक ठसा उमटवणारा ठरला असून शाळेने या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक होत आहे.