September 21, 2025 2:09 am

कोपरगाव बस स्थानक विश्रामगृहास संजीवनीकडून बेड भेट – बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे कार्य

अहिल्यानगर मराठी न्यूज: प्रशांत टेके 

कोपरगाव : संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे माजी विश्वस्त मा. बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कोपरगाव बस स्थानकावरील विश्रामगृहासाठी आवश्यक असणारे बेड भेट देण्यात आले.

हा उपक्रम म्हणजे फक्त औपचारिक उपक्रम नसून कोपरगाव शहरातील सार्वजनिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व विश्रांतीसाठी दाखवलेली खरी सामाजिक जाणीव आहे. प्रवाशांनाही आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान, संजीवनी उद्योग समूह आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे नेतृत्व सातत्याने कार्यरत असते. बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाला औचित्य साधून संजीवनीच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कोपरगाव व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

बिपीनदादा कोल्हे हे समाजसेवेचा एक आदर्श ठरले आहे. सहकार, शिक्षण,राजकारण,शिक्षण,

आरोग्य, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी आजवर अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यशैलीत संवेदनशीलता, संवाद आणि सृजनशीलता हे त्रिसूत्री तत्त्व दिसून येते. त्यांनी संजीवनी उद्योग समूहाचे कार्यक्षेत्र आज केवळ कोपरगावापुरते मर्यादित नसून, ते ग्रामीण भागाच्या आत्मसन्मानाशी जोडले गेले आहे.

यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन पराग संधान, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष वैभव आढाव, कोपरगाव बस स्थानक आगार व्यवस्थापक अमोल बनकर, डेपो मॅनेजर अविनाश गायकवाड, माजी शहराध्यक्ष डी. आर. काले, दिलीप दारुणकर, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब नरोडे, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, जितेंद्र रणशूर, बबलू वाणी, संदीप देवकर, गोपी गायकवाड, राजेंद्र बागुल, सतीश रानडे, निसारभाई सय्यद, कैलास खैरे, हाशमभाई पटेल, शंकर बिराडे, खालिलभाई कुरेशी, फकीरमोहम्मद पैलवान, स्वप्निल मंजुळ, आकाश वाजे, जयप्रकाश आव्हाड, सचिन सावंत, संतोष साबळे, प्रमोद नरोडे, चंद्रकांत वाघमारे, सागर जाधव, सुजल चंदनशिव, राकेश काले, महेश खामकर, सौरभ होते, शुभम वाजे, प्रभुदास पाखरे, बंटी पांडे, अमीन शेख, राजेंद्र गंगुले, अजय शार्दुल, राजेंद्र आढाव, शुभम सोनवणे इत्यादी उपस्थित होते.

संजीवनी उद्योग समूहाचे हे योगदान सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रत्यय देणारे असून, “समाज हिताय, समाज सुखाय” या तत्त्वाला धरून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. विशेषतः बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यपद्धतीला साजेसा असा हा एक उपक्रम ठरतो.आज त्यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता, वंचितांची साथ, कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि जनतेची सेवा या त्रिसूत्रीवर आधारित समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा होतो आहे, हेच त्यांच्या नेतृत्वाचे मोठेपण आहे.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा