September 21, 2025 2:13 am

बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाला वृक्षारोपण, रक्तदान,आरोग्य शिबिरे व विविध सामाजिक उपक्रम

अहिल्यानगर मराठी न्यूज : प्रशांत टेके

कोपरगाव : सहकार क्षेत्रातील प्रगल्भ नेतृत्व आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विशेषतः वृक्षारोपण मोहीम, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शालेय साहित्य वाटप,रेनकोट वाटप,पाणी जार वाटप आदींसह विविध उपक्रमांचा समावेश होता.

बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मतदारसंघातील तब्बल ८९ गावांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वृक्षारोपण चळवळ हाती घेण्यात आली. बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे, हे जाणून बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रेरणेतून स्थानिक पातळीवर नागरिक, शालेय विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.

आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी कोपरगाव मतदारसंघातील चितळी, टाकळी या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली.यासाठी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट दिली यामध्ये आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळाला. युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय या उपक्रमांतून पुन्हा एकदा आला.

विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शालेय कार्यक्रमांमधून त्यांच्यातील विचारशक्तीला चालना देण्यात आली.शैक्षणिक साहित्य वाटप करून अनोखा संदेश देण्यात आला. शैक्षणिक आणि सामाजिक जाणीवेचा संगम साधत हा वाढदिवस एक सामाजिक उत्सव म्हणून साजरा करण्यात आला.शेकडो ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम पार पडला यासाठी रेणुकाताई कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.

सहकार महर्षी कोल्हे कारखाना कार्यस्थळ,श्री गणेश कारखाना परिसर,अंचलगाव,शिरसगाव, वाकडी, कासली, शहाजापूर, पुणतांबा, उक्कडगाव, कोळपेवाडी, घोयगाव, हिंगणी, खोपडी, उक्कडगाव,आपेगांव, तळेगाव मळे, पढेगाव, हांडेवाडी, कुंभारी, करंजी, गोधेगाव, रवंदे, कारवाडी, माहेगाव देशमुख, शिरसगाव, दहेगाव बोलका, मढी बु., तिळवनी, संवत्सर, नाटेगाव, सडे, सुरेगाव, केलवड ता. राहाता, चितळी,सावळगाव,जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, शिंगणापूर, मनेगाव, डाऊच बु., रांजणगाव देश.,पुणतांबा, चांदगव्हाण, काकडी, जवळके, धोंडेवाडी, अंजनापूर,पोहेगाव,कोळगाव थडी, बहादराबाद, मल्हारवाडी, डांगेवाडी, बक्तरपूर, धामोरी, वडगाव, चासनळी, मळेगाव थडी, वेळापूर, कोकमठाण, शिरसगाव,बहादरपूर, वेस सोयगाव,बहादराबाद, कोपरगाव शहरात विविध प्रभागात उपक्रम राबविले गेले.या उपक्रमांद्वारे बिपीनदादा कोल्हे यांचे सहकार्य, समाजशीलता आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व अधोरेखित झाले. वाढदिवसानिमित्त झालेल्या या विधायक उपक्रमांनी कोपरगाव मतदारसंघात नवचैतन्य निर्माण केले आहे.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा