September 21, 2025 2:11 am

योग म्हणजे शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्याचं साधन: प्राचार्य श्री.के.बी. बारगुजे

अहिल्यानगर मराठी न्युज : शहाजी दिघे

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पाथरे बु येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुल मैदानावर शनिवारी, दि २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला १७७ देशांचा पाठिंबा दिला अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. भारतात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, दरवर्षी या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये, उद्याने आणि सामुदायिक ठिकाणी योग शिबिरे, कार्यशाळा आणि कार्यक्रम अशा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जातात . योगासने मानवाची शारीरिक, मानसिक, व आत्मिक संतुलन नीट राहण्यासाठी खुप गरजेचे आहे. असे प्रतिपादन यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.के.बी. बारगुजे यांनी केले त्याचप्रमाणे २१ जून या दिवसाचे भौगोलिक महत्त्व देखील त्यांनी सांगितले. यावेळी विद्यालयाची क्रीडा शिक्षक श्री ज्ञानेश्वर जोंधळे सर यांनी योगासनांचे विविध प्रकाराची प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यालयातील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्रद्धा वाणी मॅडम प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री नवनाथ घुगे सर पर्यवेक्षक श्री आण्णासाहेब तांबे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. संदीप म्हस्के सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा