अहिल्यानगर मराठी न्युज:शहाजी दिघे
राहुरी तालुक्यातील सात्रळ सोनगाव येथे पत्रकार अनिल वाकचौरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर वनविभागाने तात्काळ पिंजरा लावला.रविवारी पत्रकार अनिल वाकचौरे यांना त्यांच्या मित्राचा फोन आला आईला शेतात सोडा म्हणून पत्रकार वाकचौरे हे मोटारसायकल वरून त्यांना शेतात सोडून परत येत असताना साबळे पडघलमल वस्तीजवळ बिबट्या अचानक शेतातून बाहेर आला व वाकचौरे यांच्या गाडीवर हल्ला केला. या झटापटीत बिबट्याने पंजा मारला सुदैवाने पत्रकार वाकचौरे यांचा कुडता बिबट्याच्या नख्यात अडकला व ते खाली पडले. सुदैवाने शेजारील वस्तीवरील लोकांनी हा प्रसंग पाहिला व चार पाच जन त्यांच्याकडे धावत गेले. माणसे पाहून बिबट्याने धुम ठोकली व पुढील अनर्थ टळला.
पत्रकार वाकचौरे यांना ताबडतोब सोनगाव पेठेतील डॉक्टरांकडे घेऊन गेले ते खुप घाबरलेले होते त्यांचा ब्लडप्रेशर वाढलेला होता. बातमी कळताच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने दवाखान्यात जमा झाले होते. या घटनेतून आपला मित्र बालंबाल बचावले हे पाहून सर्व जण सुखावले होते
वनविभागाचे वनरक्षक श्री पठाण यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी राहुरी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सुनिल साळुंखे, वनपाल शेंडगे यांना माहिती दिली. श्री साळुंखे यांनी तातडीने शेंडगे , पठाण आणि टीमला घटनास्थळी पाठवले व तात्काळ पिंजरा लावण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पिंजरा लावल्याबद्दल परिवारातील नागरिकांची समाधान व्यक्त केले व वनविभागाचे आभार व अभिनंदन केले.