अहिल्यानगर मराठी न्युज
लोणी : अलमट्टी धरणाच्या विषयासंदर्भात आज विधानभवनाच्या समिती कक्षात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेची माहीती सर्व उपस्थित मंत्री खासदार आणि आमदार महोदयांना देण्यात आली.
प्रामुख्याने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास राज्य सरकारने ठामपणे विरोध केला आहे. यासाठी तज्ञ विधीज्ञांचा सल्ला घेवून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
लोकसभा अधिवेशन सुरू होत असल्याने या भागातील सर्व लोकप्रतिनिधीच्या शिष्टमंडळ केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री. सी.आर पाटील यांच्याकडे नेवून वस्तूस्थिती मांडण्यात येणार असल्याचे ठरले. सद्यस्थितीत पुराचे नियंत्रण करण्यासाठी जलसंपदा विभागाने केलेल्या उपाय योजनांची माहीती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीला मंत्री सर्वश्री मा. चंद्रकातदादा पाटील, मा. प्रकाशजी आबीटकर, छत्रपती मा.खा. शाहू महाराज, खा. धैर्यशीलजी माने, खा. विशालजी पाटील, माजी मंत्री आ. जयंतजी पाटील, आ. सुरेशजी खाडे, आ. विनयजी कोरे, आ. सदाभाऊ खोत, आ. सतेजजी पाटील, आ. विश्वजीतजी कदम, आ. गोपीचंदजी पडळकर, आ. इद्रीसजी नाईकवाडी, आ. अरूणजी लाड, आ. अमलजी महाडीक, आ. शिवाजी पाटील, आ. राजेंद्रजी यड्रावरकर, आ. रोहीत पाटील यांच्यासह विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत गुणिले यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.