अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
लोणी : येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले शंकर सोनवणे यांची सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतलेला आहे .
त्यांची निस्वार्थ सेवा आणि संघटनेतील योगदानाला पाहून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सारिकाताई नागरे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री दत्तात्रय दहिवाळ महाराज दत्त दिगंबर पीठ लाडगाव छत्रपती संभाजी नगर यांच्या आशीर्वादाने ही निवड करण्यात आली .
सामाजिक कार्यकर्ते शंकर सोनवणे यांची राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल
डॉ. सारिकाताई नागरे व राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख रवीशेठ माळवे यांच्यासह सुवर्ण भरारी संस्थेचे प्रदेश अध्यक्ष श्री. संदिप दादा मानकर , प्रदेश संपर्क प्रमुख श्री. संजय तळेकर मूर्ती , मुक्ताताई डहाळे, भाग्यश्री ताई पाटील, श्री. राजेंद्र कुलथे, श्री. संतोष सोनार, श्री. श्रीराम उजेंकार, श्री. नारायण देशमुख , प्रशांत टाक , संजय सोनार साहेब पुणे, गुरुनाथ बोराडे, गोकुळ चिंतामणी , मेजर शेवंते, आणि सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष, ज्ञानेश्वर साबळे , अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .त्यांच्या या निवडी बद्दल लोणी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.