September 11, 2025 1:17 pm

भंडारदरा धरणातून नदीपात्रात सांडव्याद्वारे विसर्ग 

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे 

राहूरी :आज दिनांक २६/०७/२०२५ रोजी भंडारदरा धरणातील एकूण पाणीसाठा दुपारी १२:०० वाजता ९१६५ दलघफु इतका झाला असल्यामुळे. धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज शनिवार दिनांक २६/०७/२०२५ रोजी धरण पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भंडारदरा धरणातून आज संध्याकाळी ६:००वाजता नदीपात्रामध्ये ४००० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यांत येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये भंडारदरा धरणातून नदीपात्रामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येईल. तरी    कार्यकारी अभियंता अहिल्यानगर पाटबंधारे विभाग,अहिल्यानगर यांच्यावतीने नदीकाठच्या गावांना जाहीर आवाहन करण्यात आले असुन, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित वा वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.                                                        

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें