अहिल्यानगर मराठी न्यूज :अनिल वाकचौरे
सात्रळ (प्रतिनिधी ) राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र धानोरे पंचक्रोशी येथून खुलताबाद भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा दौलत ग्रुप,जय भद्रा युवक मित्र मंडळ आयोजित भव्य पायी दिंडी सोहळा दिनांक २८जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आला.
श्री क्षेत्र धानोरे घाटावरून या पायी दिंडीचे खुलताबाद भद्रा मारुतीकडे प्रस्थान झाले आहे ह भ प उद्धव महाराज मंडलिक वरद विनायक सेवा धाम लोणी यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प महंत दत्तगुरुजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र वरवंडी उंब्रेश्वर देवस्थान यांच्या प्रमुख उपस्थितीत व ह.भ. प.विठ्ठल पंतजी महाराज उंच खडक अकोला व ह.भ.प. बबन महाराज प्रधान व गुरुवर्य सुनील काका कुलकर्णी यांच्या सहकार्याने दिंडीचा प्रवास मार्ग प्रस्थान झाले आहे यावेळी ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली रथ,घोडा,सनई वाद्य भजनी मंडळ यांनी मिरवणूकीची शोभा वाढविली. यावेळी मोठ्या संख्येने भक्त भद्रा मारुती प्रस्थान झाले आहे. धानोरे येथून निघालेली पायी दिंडी यांचा मुक्काम राहाता, एकनाथ मंगल कार्यालय भोजाडे, श्री वीरभद्र मंदिर मुक्काम वैजापूर, वैष्णवी लॉन्स गायकवाड बंधू लासुर स्टेशन, देवी दक्षिणाई मंदिर भक्तनिवास खुलताबाद असा असणार आहे अशी माहिती पायी दिंडीचे चालक रोहिदास कानडे, योगेश सिन्नरकर,भारत दिघे बाळासाहेब व्यास, भगवान गीते यांनी दिली.