अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
कोपरगाव :कोपरगाव येथील कृष्णाई बॅंक्वेट हॉलमध्ये दैनिक सार्वमतच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित ‘सहकार मंथन परिषद व विशेषांक प्रकाशन सोहळा’ आज जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला आशुतोष काळे हे उपस्थित होते. त्यांनी सहकार क्षेत्रातील आव्हाने, संधी आणि युवकांचा सहभाग या विषयांवर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला दैनिक सार्वमतचे चेअरमन मा.श्री. विक्रमजी सारडा, नेवासा मतदारसंघांचे आमदार मा.श्री. विठ्ठलराव लंघे, संपादक मा.श्री. अनंतजी पाटील, महानंदाचे माजी चेअरमन मा.श्री. राजेशआबा परजणे, समता उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. काकासाहेब कोयटे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. विवेकजी कोल्हे, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार व सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.