अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
लोणी : पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन जन्मस्थळी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोभावे दर्शन घेतले. माऊलींच्या चरणी झालेला हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मंगलमय आणि आत्मिक शांती देणारा असल्याचे ते म्हणाले.
ज्ञान, भक्ती आणि समत्वाचा संगम असलेल्या माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत परंपरेला एक अजरामर ग्रंथ दिला. त्यांनी वारकरी संप्रदायाला एक अधिष्ठान दिलं, आणि सर्वसामान्य जनतेसाठी अध्यात्म सुलभ केलं. “विवेक बुद्धीने युक्त झालेला भक्तिचा मार्ग”, हे त्यांनी आपल्या जीवनातून शिकवलं.
यंदाचे वर्ष हे माऊलींच्या जयंतीचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या पवित्र निमित्ताने माऊलींच्या चरणी जनकल्याणासाठी अधिक सेवाभावाने, नम्रतेने आणि विवेकाने कार्य करण्याची बळ आणि प्रेरणा मिळो, ही प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या समवेत असंख्य ग्रामस्थ व जनसमुदाय होता.