September 11, 2025 8:36 am

सात्रळ महाविद्यालयात लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व स्व. सिंधुताई विखे पाटील यांची जयंती साजरी 

अहिल्यानगर मराठी न्यूज : अनिल वाकचौरे

सात्रळ, दि. १ : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ, ता. राहुरी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व उत्सव समिती यांच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व स्व. सिंधुताई विखे पाटील यांचा जयंती समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘जय बाबा’ या वृत्तपत्राचे पत्रकार श्री. अनिल वाघचौरे विजय घोलप उपस्थित होते.

         विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उपस्थितीत प्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे होते. प्रास्ताविक उत्सव समितीचे प्रमुख प्रा. राहुल कडू यांनी केले. यावेळी उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रो. (डॉ.) रामदास बोरसे, प्रा. दिनकर घाणे तसेच प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.

     याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकार श्री. अनिल वाघचौरे म्हणाले,”स्वातंत्र्य, स्वराज्य, स्वदेशी या मूलमंत्र्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेले सामाजिक कार्य ऐतिहासिक होते. लोकनाट्य , कला पथक, शाहिरी व साहित्याच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार अण्णाभाऊंनी घराघरात पोहोचवले. दीन दुबळ्या, वंचितासह कामगार, कास्तक-यांचा आवाज झालेल्या ख-याखु-या साहित्यसम्राटास, लोकसाहित्यिकास क्रांतिकारी सलाम. प्रियदर्शनी महिला मंडळ व प्रियदर्शनी ग्रामीण पतसंस्थेच्या संस्थापक स्व. सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांनीही सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य मौलिक आहे”.

     यावेळी कु. पायल घोलप या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा. राहुल कडू, डॉ. एकनाथ निर्मळ, प्रा. आदिनाथ दरंदले, राजनाथ गोडगे तसेच सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें