अहिल्यानगर मराठी न्यूज: शहाजी दिघे
सात्रळ (अनिल वाकचौरे) : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने बुधवार दि. १३ ते बुधवार दि. २० पर्यंत सप्ताह होणार आहे . सप्ताहाचे ४१ वे वर्ष आहे सप्ताह काळातील दैनंदिन कार्यक्रम काकडा विष्णुसहस्रनाम ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन प्रवचन हरिपाठ नंतर जागर असं होणार आहे. तसेच कीर्तन प्रसंगी दररोज संध्याकाळी ७ ते ९ किर्तनाचा कार्यक्रम होईल. त्यामध्ये ह.भ.प. मच्छिंद्र महाराज निकम (सालाबतपूर), किरण महाराज हराळे (वैजापूर), विठ्ठल महाराज पंत गोंडे (उंचखडक), अरुणगिरी महाराज (भामाठाण), अरुण महाराज दिघे (तळेगाव दिघे), कल्याण महाराज काळे (भातकुडगाव), अश्विनीताई तांबे (दाढ बु.) आदींची कीर्तनरुपी सेवा होणार आहे. तसेच मंगळवार दि.१९ रोजी ह. भ.प. दत्तगिरी महाराज (वरवंडी) यांच्या हस्ते दीपवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच बुधवार दि. २० रोजी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे (ताहाराबाद) यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होणार आहे. तसेच श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवार दि. २० रोजी रात्री ९ ते ११ उपविजेता महाराष्ट्राचा – लाडका किर्तनकार सोनी मराठी ह.भ.प. हर्षद महाराज भागवत (लोणी) यांचे कीर्तन होणार आहे .
तरी भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा उपस्थित राहावे असे आव्हान समस्त गावकरी मंडळ सात्रळ यांनी केले आहे. सप्ताहाचे ठिकाण हनुमान मंदिर सात्रळ येथे आहे.