अहिल्यानगर मराठी न्यूज : राहुल फुंदे
शिर्डी प्रतिनिधी : शिर्डी शहरात गोकुळाष्टमीच्या रात्री ११:३० वाजेच्या सुमारास १७ ऑगस्ट २०२५ रोजी नगर मनमाड रोड लगत असलेल्या जैन मंदिरासमोर पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या मारामारीत साई सुनील कुमावत वय १९ व शुभम सुरेश गायकवाड व १८ यांनी सानू कुमार ठाकूर याच्यावर प्राण घातक चाकुच्या साह्याने हल्ला करून जीवे ठार मारले ही घटना घडताच शिर्डी पोलिसांना माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत जखमी सानुकुमार ठाकूर वय १८ रा श्रीराम नगर शिर्डी याला दवाखान्यात दाखल केले असता त्यापूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय सूत्रानी सांगितले या संदर्भात शिर्डी येथे अधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे शिर्डी पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की तिघेही एकमेकांचे मित्र असून यापूर्वीच्या वादातून त्यांनी सानूकुमार ठाकूर याच्यावर हल्ला केला असता त्यात ठाकुर यांचा मृत्यू झाला असून या संदर्भात ते म्हणाले की हे आरोपी प्राथमिक तपासात नशेत असल्याचे दिसून येते यातील दोन्ही आरोपींना शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल केला असून साई कुमावत व शुभम गायकवाड. यास अटक केलेली असून या संदर्भात या घटनेची शिर्डी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे हे करीत आहे यापूर्वी देखील काही महिन्यापूर्वी नशेत असलेल्या आरोपींकडून साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा खून झालेला होता ती घटना ताजी असतानाच गोकुळ अष्टमीच्या रात्री पुन्हा एकदा तरुण मुलाचा खून झाल्यामुळे शिर्डी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या बाबत ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे