अहिल्यानगर मराठी न्यूज संपादक शहाजी दिघे
सोनगाव प्रतिनिधी (अनिल वाकचौरे) : राहुरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवार दि. ७ सप्टेबर रोजी राहुरी तालुक्यात तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत तालुकास्तरीय व शहर स्तरावर समता परीषदेत सामाजीक कार्य करण्याची इच्छा असलेल्या ओबीसी व समता सैनिकांनी उपस्थीत रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केले आहे.
आखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींना न्याय देण्याचे कार्य भारत भर सुरू आहे. याच धर्तीवर राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, शहर व ग्रामीण भागात गाव तेथे समता परीषदेची शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाभर या प्रमाणे बैठका घेण्यात येणार आहे.या बैठकीस समता परीषदेचे प्रदेश प्रचारक प्रा. संतोष विरकर, समता परीषदेचे जेष्ठ नेते माजी आमदार पांडूरंग अभंग, जेष्ठ मार्गदर्शक व प्रदेश कार्यकारीणी सदस्य पद्मकांत कुदळे, विभागीय अध्यक्ष मच्छींद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष अंकुशराव ताजणे आदि प्रमुख मान्यवर उपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीत तालुकावार कार्याचा आढावा घेवून त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीचे ठिकाण जेष्ठ नागरीक हॉल राहुरी येथे दुपारी २ वाजता बैठक संपन्न होत आहे.या बैठकीस राहुरी तालुक्यातील ओबीसी बांधव समता सैनिकांनी उपस्थीत रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष बाळासाहेब गिरमे, किरण पा अंत्रे, सतीश फुलसौंदर, धनंजय दुधाळ, किशोर राऊत,भूषण मदने,शुभम धाडगे, बंटीभाऊ कोरडे,योगेश लोखंडे,रोहित घोगरे यांनी केले आहे.