September 19, 2025 7:01 am

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केंद्राचे भूमीपूजन संपन्न !

अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा

राहूरी प्रतिनिधी : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंचोडी पाटील येथील उपबाजार केंद्राचे भूमीपूजन राज्याचे पणनमंत्री श्री. जयकुमार रावल जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार श्री. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने केलेल्या यशस्वी विस्ताराबद्दल सर्व संचालकांचे अभिनंदन केले.

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकरी हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. तसेच, उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणासोबतच ई-नाम योजनेतून बाजार समित्यांना जोडल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य दर पारदर्शक पद्धतीने समजू लागले आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भविष्यातील स्पर्धात्मक वातावरण बाजार समित्यांनी आत्मसात करण्यावर भर दिला. तसेच, महिला बचत गटांना धनादेशाचे वितरण करून स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी मंत्री श्री. बबनराव पाचपुते, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग, श्री. अनिल मोहीते, माजी भाजयुमो अध्यक्ष श्री. अक्षय कर्डिले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें