September 19, 2025 7:02 am

धानोरे गावचे आराध्य दैवत अंबिका माता व कळमजाई माता नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन

अहिल्यानगर मराठी न्यूज शहाजी दिघे
धानोरे प्रतिनिधी – श्रीक्षेत्र धानोरे (घाट) ता. राहुरी जि. आहिल्यानगर येथे श्री अंबिका माता व कळमजाई माता नवरात्र उत्सवानिमित्ताने ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भजनी मंडळ, धनेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने आश्विन शु ।।१ सोमवार दि.२२/९/२०२५ ते गुरूवार दि. २/१०/२०२५ अखेर आयोजित केला आहे.शारदीय नवरात्र उत्सवाचे हे वर्षे ३८ वे वर्ष असल्याचे उत्सव समितीने सांगितले शारदीय नवरात्र काळात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या ग्रामस्थ, भजनी मंडळ व उत्सव समिती तसेच धनेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचेकडून परिसर स्वछता, आर्थिक नियोजन, कळस रोहन कार्यक्रम, मिरवणूक कार्यक्रम , घटस्थापना, किर्तन नियोजन, दररोज किर्तन प्रसंगी करण्यात येणारे अन्नदान, संतूपूजन, मंडप उभरणी करणे, विदयुत रोषणाई,पाणी व्यवस्थापन, कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त ग्रामस्थांना कळविणे असे नियोजन सुरु आहे.
यामध्ये हरिपाठ सायंकाळी ५ ते ६.३०, सकाळी व सायंकाळी ६.३० वा. पंचोपचार पूजा व देवीची आरती तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तन होईल. घटस्थापनेच्या दिवशी मंदिरावरील कलश रोहणाचा कार्यक्रम होणार आहे.
उत्सव काळतील कार्यक्रम गोंधळ देवीचा सुशाबाई भालेराव व सहकारी रामपुर, ह.भ.प.गुरुदेव महाराज धारणगांवकर, ह.भ.प.महेश महाराज रिंधे,ह.भ.प.विश्वनाथ महाराज गिरी, ह.भ.प.संदीप महाराज खंडागळे,ह.भ.प.अरुण महाराज दिघे, ह.भ.प.निलेश महाराज कोरडे,ह.भ.प. बालयोगी अमोल महाराज जाधव वाकोडी संस्थान,भागवताचार्य ह.भ.प.राधीकाताई करंजीकर, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज काळे समाज प्रबोधनकार, ह.भ.प.जयश्रीताई तिकांडे, (माझा ज्ञानोबा मालिका फेम मायबोली चॅनल) यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे अंबिका माता प्रतिमेची मिरवणूक होईल. व ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तरी नवरात्र उत्सव काळात होणाऱ्या किर्तन श्रवणाचा परिसरातील ग्रामस्थांनी महिला भगिनीं यांनी लाभ घ्यावा असे शारदीय नवरात्र उत्सव समिती व धनेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनचेकडून कडून आव्हान करण्यात आले आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें