परीक्षेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणदान बिनचूक आहे की नाही?, याची फेरतपासणी आता ‘डायट’चे अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता परीक्षेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणदान बिनचूक आहे की नाही?, याची फेरतपासणी आता ‘डायट’चे अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी सर्व शाळांना पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वर्षभर जगत करून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली जाते का? तसेच त्यांच्या गुणांची पडताळणी योग्य केली जाते का? याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) माध्यमातून होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातीत अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली. अनेकांना वाचायला देखील जमत नसल्याचे या सर्वेतून उघड झाले. दुसरीकडे सरकारी शाळांमधील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली.शाळांची गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या इयत्तेत पुढे जाताना त्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार व्हावा, यासाठी आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकलपास करण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचे नियोजन ‘एससीईआरटी’कडून करण्यात आले आहे
