मलेशियामध्ये भारतीय संघाने इतिहास रचला आहे. महिलांच्या १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आफ्रिकेला ८२ धावांवर गुंडाळले व सोपे लक्ष्य स्वीकारले. ८३ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या ११.२ षटकांत गाठले आणि ९ विकेट्सने फायनल जिंकली. १९ वर्षांखालील महिलांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकला आहे.
२०२३ मध्ये झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा अंतिम सामना इंग्लंडविरूद्ध झाला होता आणि या सामन्यात भारताने ७ विकेट्ने विजय मिळवला होता. आज दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामन्यात ८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघी १ विकेट खर्च केली आणि Women’s U19 T20 World Cup २०२५ आपल्या नावे केला. भारतीय पुरूष संघाने देखील फायनलमध्ये आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत २०२४ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.
सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी तुफान फलंदाजी केली. ३६ धावांवर भारताला पहिली विकेट गमवावी लागली. स्टार फलंदाज जी कमलिनी ६ धावांवर माघारी परतली. पण त्यानंतर गोंगडी त्रिशाने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीमध्येही कमाल करून दाखली. तिने सानिका चाळकेला साथील घेत ४८ धावांची नाबाद भागीदारी केली. ज्यामध्ये त्रिशाने ८ चौकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले. तर सानिका चाळकेने २२ चेंडूत २६ धावांची कामगिरी केली. भारताने १२ व्या षटकात लक्ष्या गाठले आणि ९ विकेट्सने सामना जिंकला.
भारतीय महिला संघ
गोंगडी त्रिशा, निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), आयुषी शुक्ला, भाविका अहिरे, इश्वरी अवसारे, व्हिजे जोशिस्ता, जी कामालिनी, द्रीथी केसरी, अनादिता किशोर, मिताली विनोद, परूणिका सिसोडिया, वैष्णवी शर्मा, शबनम शकील, सोनम यादव