September 11, 2025 8:36 am

डॉ. सुजय दादा विखे पाटील व धनश्री ताई विखे यांच्या सहपत्नीक रॅम्प वॉकने कार्यक्रमाला रंगत

सुजय विखे व धनश्रीताई विखे यांनी कोल्हार येथील हळदी कुंकू कार्यक्रमात आणली रॅम्प वॉक ने रंगत 

अहिल्यानगर :शहाजी दिघे

अहिल्यानगर :राहाता तालुक्यातील कोल्हार येथे संक्रांतीच्या आनंदात जनसेवा फाउंडेशनतर्फे महिलांसाठी एक भव्य हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, ज्यामुळे समारंभाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. संक्रांतीच्या शुभदिनी महिलांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम रचला गेला होता.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते डॉ. सुजय दादा विखे पाटील व धनश्री ताई विखे यांचा सहपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक. या रॅम्प वॉकने उपस्थित महिलांना विशेष आनंद दिला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण विषयक चर्चा आणि पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली.

डॉ. विखे पाटील दांपत्याने उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत महिलांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें