September 11, 2025 1:14 pm

शेतकरी ओळखपत्रासंदर्भातील तुमच्या मनातील १० प्रश्न आणि त्यांची उत्तरं,

सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आहे. भविष्यात, शेतकरी ओळखपत्राशिवाय पीएम-किसान, पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

शेतकरी ओळखपत्र म्हणजे नक्की काय? ते का गरजेचे आहे? आणि ते कसे मिळवायचे? या 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊया.

१) शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?

हे एक डिजिटल ओळखपत्र आहे, जे शेतकऱ्याच्या आधार कार्डला त्याच्या जमिनीच्या नोंदींशी जोडते. हा सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे.

२) शेतकरी नोंदणी म्हणजे काय?

ही एक अशी प्रणाली आहे.ज्यात शेतकरी आणि त्यांच्या जमिनीची सविस्तर माहिती नोंदवली जाते. सरकारला योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होते.

३) शेतकरी ओळखपत्राची गरज काय?

हे ओळखपत्र शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकत्र करेल, त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल आणि वारंवार केवायसी करण्याची गरज राहणार नाही.

४) ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे का?

होय! हे बनवणे आता अनिवार्य आहे. शेतकरी ओळखपत्राशिवाय कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही.

५) शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे?

शेतकऱ्यांना https://hrfr.agristack.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. ग्रामपंचायत स्तरावरही या संदर्भातील मदत उपलब्ध आहे.

६) ओळखपत्राचा उपयोग कसा होईल?

यामुळे सरकारला शेतकऱ्यांची जमीन, पिके आणि पशुधन याबाबत संपूर्ण माहिती मिळेल. योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकेल.

७) कोणत्या राज्यांमध्ये ही योजना लागू आहे?

गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये याचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. आसाम, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये चाचण्या सुरू आहेत.

८) नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

आधार कार्ड

आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर

खसरा-खतौनीची प्रत

ओळखपत्र बनवताना शेतकऱ्याची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे.

९) शेतकरी ओळखपत्राचे फायदे कोणते?

तुम्ही वारंवार ई-केवायसी करण्याची गरज नाही. डिजिटल KCC द्वारे बँकेतून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकता . पीक विमा आणि शासकीय अनुदान पारदर्शक पद्धतीने मिळेल.

१०) कोठे अर्ज करावा?

या साठी प्रत्येक राज्याचे स्वतंत्र पोर्टल आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी agristack संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें