September 11, 2025 12:54 pm

स्टार्टअप करीता प्रवरा मार्गदर्शन करेल -डॉ.सुस्मिता विखे पाटील

सोनगाव :शहाजी दिघे 

सोनगाव : स्टार्टअप आणि इनोव्हेशन या माध्यमातून व्यवसाय निर्मितीसाठी मोठ्या संधी आहेत. कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले उद्योजक घडवण्यासाठी प्रयत्न होऊन स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभे करण्यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन आणि उपक्रम केंद्र, पुणे आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत पीसीआरसी रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अॅण्ड मिडीयम एन्टरप्रायजेस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील “स्टार्टअप आणि इनोव्हेशन सेल” स्थापन केलेल्या महाविद्यालयां मधील समन्वयकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत डॉ.काळकर यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे मार्गदर्शन केले.यावेळी विद्यापीठाचे नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ संचालक डाॅ.देविदास गोल्हार, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे प्राचार्य डाॅ. गुल्हाने, प्रिझम फोरमचे डॉ संजय कुरकुटे नितीन जाधव, यु.पी.नाईक आदीसह जिल्हातील महाविद्यालयांचे समन्वयक उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. काळकर म्हणाले, विद्यापीठाच्या माध्यमातून स्टार्टअप आणि इनोव्हेशन साठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देत, नवीन शिक्षण पद्धतीची अमंलबजावणी करावी.नव उद्योजक उभारणीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करुन विद्यार्थीना सुध्दा व्यवसाय निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिता विखे पाटील म्हणाल्या प्रवरेच्या माध्यमातून नवउद्योजक निर्मिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून “प्रवरा बिल्डिंग” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून प्रवरेचा विद्यार्थी नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा कसा घडले हे काम सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या प्रवरा बिल्डिंगच्या माध्यमातून एक कोटीची उलाढाल ग्रामीण विद्यार्थ्यांनी करतानाच ग्रामीण भागातील उद्योगांना चालना आपण देऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून देता आला. भविष्यामध्ये विद्यापीठ आणि शासनाच्या विविध योजनेची माहीती देण्याबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मध्ये विविध सेवा सुविधा देखील उपलब्ध केल्या आहेत. अहिल्यानगर मध्ये सर्वात जास्त स्टार्टअप आणि इनोव्हेशन कसे उभे राहतील यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून राज्यात नवे मॉडेल उभे करण्यासाठी प्रवरा प्रयत्न करणार असे सांगितले.

डॉ. देविदास गोल्हार यांनी ग्रामीण भागात प्रवरेचे काम चांगले आहे. विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण धोरणामुळे मोठी संधी आहेत नोकरी उपलब्ध करून देणे अवघड असले स्टार्टअप आणि इनोव्हेशन माध्यमातून विद्यार्थ्यांना आता नव उद्योगाकडे वळावे लागणारा लागणार आहेत यासाठी क्लस्टर उभारणीचा विचार करावा लागेल असे त्यांनी सुचित केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. संजय गुल्हाने यांनी प्रवरेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत असतानाच विकासात्मक भारत उभा करण्यासाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार डॉ. संजय कुरकुटे यांनी मानले

कार्यशाळेमध्ये जिल्ह्याभरातील दीडशे समन्वयक सहभागी झाले होते. स्टार्टअप आणि इनोव्हेशन उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती कार्यशाळेमध्ये देण्यात आली.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें