कोपरगाव :प्रशांत टेके
कोपरगाव : महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन महिन्यांपासून शासकीय दराने शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी सुरू केली होती. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अधिकृत नोंदणी करून घेतलेली आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनाही स्वच्छ केलेली सोयाबीन वजन करून पोहच करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलेली आहे.तरीही अजूनही शासकीय खरेदी केंद्रावर नोंद केलेल्या बऱ्याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन अजून घरातच पडलेले आहेत. ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने खरेदी करून पैसे दिले त्यामुळे त्यांना थोडा तरी दिलासा मिळाला खरा. पण शासकीय खरेदी केंद्रावर नोंद करूनही खरेदी केंद्रे शासनाने बंद करून टाकले. त्यामुळे शासन आपली सोयाबीन खरेदी करणार या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन घरातच पडून असल्यामुळे ते सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणत आहे की आम्ही काय शासनाचे घोडे मारले आहे का? तरी शासनाने ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंद करून घेतलेल्या आहेत, निदान त्यांच्या तरी सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.