September 11, 2025 1:23 pm

पठारभागातील वारंवार खंडीत होणारा व अपुर्ण दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यां सोडविल्या जातील -आमदार अमोल खताळ 

साकुर :प्रतिनिधी 

साकूर: पठारभागातील वारंवार खंडीत होणारा व अपुर्ण दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज साकूर सब स्टेशन येथे शेतकरी आणि नागरिकांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार अमोल खताळ यांनी आढावा बैठक घेतली.

या बैठकीत साकूर, मांडवे, कर्जुले पठार (डोळासणे), घारगाव व खांबे या सब स्टेशन्स अंतर्गत येणाऱ्या गावांतील शेतकरी व नागरिकांनी वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, तांत्रिक अडचणी याच्याशी संबंधित अनेक समस्या मांडल्या.

यासंबंधी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक सुधारणा करण्याचे, शेतकऱ्यांना, नागरिकांना अधिक चांगला वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.या बैठकीस महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें