September 21, 2025 8:16 pm

रयत सेवक हा एकसंघ परिवार : सुधीर म्हस्के

सोनगाव :प्रतिनिधी              

सोनगाव -रयत सेवक हा समाजात जिव्हाळ्याने आणि सह्रदयतेने सेवा देणारा सेवक असून रयत हा एकसंघ परिवार आहे असे प्रतिपादन श्रीरामपूर दूध संघाचे चेअरमन सुधीर म्हस्के यांनी केले.

तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील सेविका मुमताज शेख यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामपूर दूध संघाचे चेअरमन सुधीर म्हस्के हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती मुमताज शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संजय ठाकरे, भारती भुसारी, गोरक्षनाथ बनकर, शिवाजी बेंद्रे, माजी प्राचार्य मधुकर अनाप, माजी प्राचार्य अंगद काकडे, माजी प्राचार्य अण्णासाहेब साबळे, तौसिक शेख, सत्कारमूर्ती मुमताज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रमुख तोरणे यांनी रयत सेवकांची एकनिष्ठा आणि त्यागाविषयी विचार मांडून रयत सेवकांची अण्णांवरील श्रद्धा हा खरा भक्तिभाव आहे, असे मत व्यक्त केले. सुधीर म्हस्के यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्यप्रती रयत सेवकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. रयत सेवक हा एकसंघ परिवार असून रयत सेवक निष्ठेने आणि ध्येयाने एकरूप असल्याचे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी शिवाजी बेंद्रे यांनी ॲग्री विषययात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीसासाठी पन्नास हजार रुपयांचा ठेवीचा चेक प्राचार्य विनायक मेथवडे यांच्याकडे सुपूर्द केला. तर कन्या विद्यालयासाठी पन्नास हजार रुपये देणगी व मुमताज शेख यांनी मुले विभागासाठी अकरा हजार रुपये देणगी जाहीर केली. याप्रसंगी रतिलाल भंडारी. चंदूभाई तांबोळी, भाऊसाहेब पेटकर, समशेर पठाण, माजी प्राचार्य जी. टी. गमे, मुख्याध्यापक देवराम वडीतके, गणीभाई शेख, राजूभाई शेख, सलीम शेख, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, पर्यवेक्षिका शोभा कडू, पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे, शोभा चौधरी, शरद शिंदे, जावेद शेख, गफार तांबोळी, मुस्ताक पटेल, यासीन शेख, विद्या विकास पब्लिक स्कुल चे प्राचार्य राजेंद्र नालकर, शिंपी सर, पवार सर, शहाजी दिघे,समीर पटेल, राजेंद्र कुलकर्णी,जावेद तासगावकर, सादिक शेख, सलीम शेख, बानू शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, अश्विनी सोहोनी व रेणुका वरपे यांनी केले. तर शेवटी दिलीपराव डहाळे यांनी आभार मानले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा