शिर्डी : राहुल फुंदे
आज धोंडेगाव आश्रमशाळेत मा. आयुक्त लीना बनसोड मॅडम (भाप्रसे) आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या शुभ हस्ते आय बी टी रुम चे उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आदिवासी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी, संस्थेचे सेक्रेटरी मा. आर्चिस नेर्लिकर सर, ट्रस्टी मा.निरंजन ओक सर, समन्वयक डॉ. हेमंत कोतवाल सर व कोतवाल मॅडम, शाळेचे निरीक्षक श्री वसंत एकबोटे सर, संस्थेचे सी ई ओ मा. नरेंद्र बर्वे सर, संस्था देणगीदार धारकर मॅडम, आशिज सर, गोगटे मॅडम, माजी मुख्या. अलका एकबोटे मॅडम, सर्व पदाधिकारी, पालक वर्ग कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमात स्वागत, विद्यार्थी प्रेझेनटेशन व आय बी ती., थ्रीडी प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक, ऊर्जा व पर्यावरण, अभियांत्रिकी, शेती व पशुपालन, गृह व आरोग्य विषयी माननीय आयुक्त मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारुन माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री मिलिंद चोथे सर, प्रस्ताविक मा. वसंत एकबोटे सर, आभार प्रदर्शन श्री सुनील जाधव सर यांनी केले. शाळेत दोन तास वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा. आयुक्त मॅडम यांनी विद्यार्थ्यांविषयी व शाळेबद्दल समाधान व्यक्त केले.