September 21, 2025 6:39 pm

“श्री क्षेत्र शिंगवे येथे श्री हरिहरेश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्या निमित्ताने भव्य किर्तन महोत्सव सप्ताहाचे आयोजन “.                                                  

प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक .                     राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र शिंगवे येथे श्री हरीहर गोविंद आश्रमात श्री हरीहरेश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्या निमित्ताने गुरुवार दि.२४ एप्रिल २०२५‌ ते १ मे २०२५ या पर्व कालात भव्य दिव्य किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून कलश पुजन व ग्रंथपुजन होईल तसेच मुर्ती प्राणप्रतिष्ठा विधी अनंत शास्त्री लावर यांच्यासह ब्रम्हवृंदांच्या मुखार्विदातून मंत्रोच्चारात होईल. या किर्तन सप्ताहात ह.भ.प. शिवाजी महाराज भालूरकर, ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के, ह.भ.प.महादेव महाराज बोराडे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज गुंजाळ, ह.भ.प.प्रकाशानंदगिरी महाराज, ह.भ.प.भगवान महाराज जंगले आदी नामवंत किर्तनकाराचे अनुक्रमे सात दिवस सायंकाळी ७ ते ९ या पर्वकाळात किर्तन होणार असून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.दररोजच्या महाप्रसादाच्या पंगतीसाठी परीसरातील अनेक भाग्यवंत अन्नदान करणार आहेत. त्याचबरोबर दैनंदिन कार्यक्रमात दररोज पहाटे ५ ते ७ काकडा, सकाळी ७ ते ७.३० विष्णू सहस्त्रनाम पठण, ठिक ८ ते ११ श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी ४.४० ते ५.३० हरीपाठ त्यानंतर ७ ते ९ श्री हरी किर्तन व महाप्रसाद असा नित्यक्रम असणार आहे. तसेच गुरूवार दि. १ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री गोदावरी धाम सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल व त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री हरीहर गोविंद आश्रमाचे मठाधिपती आचार्य भगवान महाराज शास्त्री व स्वामी साई सुरेशानंद भारती महाराज यांनी दिली.                                    

 या भव्य दिव्य किर्तन महोत्सवास सदिच्छा भेट देणारे महंत -: ह.भ.प. महंत भास्करगिरी महाराज, स्वामी भारतानंदगिरी महाराज, स्वामी रमेशगिरी महाराज, स्वामी रामानंदगिरी महाराज, स्वामी अखंडानंदगिरी महाराज, प.पू. ओमकार सिंगबापू महाराज, प.पू.राघेश्वरानंदगिरी महाराज, प.पू.सिताराम बाबा मगर, प.पू.देविदास महाराज म्हस्के आदी महंत सदिच्छा भेट देवून आशिर्वचन देतील. 

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा