शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी कर्मचाऱ्यांना लागू केलेली जनधन आरोग्य योजना ही सक्तीची केलेली आहे. परंतु सदरच्या योजनेचा लाभ घेताना सरकारी नियमानुसार दिलेल्या वेळेत ई-केवायसी पालन न केल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द केले होते, ज्यामुळे त्यांना मोफत रेशन सारख्या फायद्यांपासून वंचित राहावे लागत आहे. जे कर्मचारी नियमित पणे रेशन घेतात त्यांचे नाव रेशनच्या ऑनलाईनला आहेत परंतु जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांना रेशन मिळत नाही अश्या नागरिकांची नावे ऑनलाईनला येत नाहीत तसेच त्यांची के. वाय. सी होत नाही तसेच जनधन आरोग्य योजनेलाही ही रेशन ऑनलाईन असावी लागत असल्यामुळे जनधन आरोग्य योजनेचे रजिस्ट्रेशन होत नाही अश्यातच श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी कर्मचाऱ्यांना लागू केलेला सक्तीचा निर्णय करतांना कर्मचाऱ्यांना जनधन आरोग्य योजनेचे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पुढील महिन्याचे वेतन दिले जाणार नसल्याचे पत्र दिलेले आहे.यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला असुन
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्याकडून माननीय तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी राहाता यांना निवेदन सादर करण्यात आलेले असुन कर्मचाऱ्याची अडचण होणार नाही ही काळजी घेण्याचे व तोडगा काढण्यासाठी या निवेदनाद्वारे मनसे विद्यार्थी सेना शिर्डी शहर अध्यक्ष प्रशांत रवींद्र वाकचौरे व गणेश जाधव तालुका अध्यक्ष तसेच मनसे शहर अध्यक्ष लक्ष्मण आण्णा कोतकर रवि.कुसळकर यांनी आज रोजी मागणी केली आहे आहे.