September 21, 2025 2:11 pm

इफको नॅनो खतांमुळे शेतकरी बांधवांना खते खिशात घेऊन शेती करता येणार – विवेकभैय्या कोल्हे 

कोपरगाव :प्रशांत टेके पाटील

कोपरगाव : इंडियन फारमर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडचे शुक्रवार दि. २ मे रोजी निफाड येथे नॅनो खते, द्राक्ष व कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इफकोचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थितांना संबोधित केले.अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी नाशिक बाबासाहेब पारधे होते.साधनाताई जाधव संचालक इफको किसान फायनान्स नवी दिल्ली या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना इफको संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले शेतीसाठी खते आता खिशात घेऊन जाता येतील.जगभरातून मागणी होते आहे.अमेरिकेसारख्या प्रगत देशात नॅनो खते निर्यात होत आहेत.ब्राझील नेपाळ यासारख्या देशात मागणी होते आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना असल्याने प्रतिसाद सुरूवातील कमी होता मात्र शेतकरी अनुभवाने आणि विश्वासाने दिवसेंदिवस मागणी वाढवत आहे.नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्मिती होत.निफाडमधील शेती धोरणाने जगाला दिशा देण्याचे काम आजवर केले आहे.

नॅनो खताप्रमाणे कृषी क्षेत्रात नाविन्यता आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेतीमध्ये होतो आहे. खतांचा व पाण्याचा वापर कमी होऊन खर्च वाचवत उत्पादन मात्र वाढले असल्याचे संशोधन झाले आहे.पिकाची स्थिती समजण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.

इफको ही एकमेव फर्टिलायझर कंपनी आहे जी रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी भूमिका मांडते.नॅनो फर्टिलायझर हे उत्पादन वाढीसाठी महत्वाचे ठरते आहे.प्रदूषणाने खतांचा परिणाम तितकासा पिकांवर होत नाही मात्र नॅनो खतांमुळे नव्वद टक्केपेक्षा जास्त फायदा थेट पिकांना मिळतो.यामुळे पाणी आणि मृदा प्रदूषण होत नाही असेही शेवटी कोल्हे म्हणाले

 या कार्यक्रमासाठी सुभाष काटकर विभागीय कृषि सहसंचालक नाशिक, शिवाजी आमले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक, संजय शेवाळे कृषि विकास अधिकारी, नाशिक,यु. आर. तिजारे राज्य विपणन प्रबंधक इफको पुणे, डॉ. एम. एस. पोवार वरिष्ठ प्रबंधक इफको, पुणे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

या प्रसंगी, दिपक मालपुरे राजिक, सुधाकर पवार तालुका कृषि अधिकारी, निफाड,बाळासाहेब खेडकर कृषि अधिकारी, पंचायत समिती, निफाड, शारदाताई कापसे नगराध्यक्ष नगरपंचायत निफाड, रमेशचंद्र घुगे, संपतराव डुंबरे अध्यक्ष संस्थाकरी सहसंचरित्र निफाड, सचिन गिते नगरसेवक तथा संचालक बालाजी कृषी सेवा केंद्र, निफाड,अनिल कुंदे उपनगराध्यक्ष नगरपंचायत, निफाड, बापू मोरे, रामभाऊ माळोदे,क्षेत्र अधिकारी निमिष पवार,क्षेत्र प्रतिनिधी नितीन उमराणी,सीईओ किसान हेल्प फार्मर प्रोड्युसर कंपनी, निफाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा