September 21, 2025 12:47 pm

धानोरे येथे धनेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना 

धानोरे : शहाजी दिघे 

धानोरे: राहुरी तालुक्यातील धानोरे येथे ग्रामदैवत तसेच ग्रामदेवता देवस्थानचा विकास व्हावा या उद्देशाने बोलावलेले विशेष ग्रामसभेमध्ये गावातील उत्सव साजरे करणे, देवभार यात्रा उत्सव , नवरात्र उत्सव साजरे करणे ,देवस्थानची स्वच्छता ठेवणे, दिवाबत्ती करणे ,शासन दरबारी देवस्थान विकास निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव देणे यासाठी ट्रस्ट स्थापन करणे विश्वस्त मंडळ स्थापन करणे या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच या देवस्थानचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा असून अहिल्याबाई होळकर यांनी या देवस्थानचा जीर्णोद्धार केले असल्याची पूर्वज सांगत आले आहेत. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात या ठिकाणी प्रवरा नदीवर घाट बांधलेला आहे असल्याचे आपणास पहावयास मिळते या ठिकाणी अंबाबाईचे मंदिर, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ,भगवान विश्वकर्मा, शनिदेव,श्री गणेश ,स्वामी समर्थ सेवा केंद्र ,अंजनी पुत्र हनुमान, श्री गहिनीनाथ असे देवस्थान आहेत या देवस्थानमधील 2023 या वर्षी उपसरपंच श्री ज्ञानेश्वर संतू दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली जिर्णोद्धार समिती स्थापन करून धनेश्वर देवस्थानचा व अंबिका माता यांचा जीर्णोद्धार सोहळा आयोजित करून जीर्णोद्धार करण्यात आला. आज या ग्रामसभेत असंख्य नागरिक व गावकरी उपस्थित होते. गावातील देवस्थानच्या सर्व विषयांवर चर्चा होऊन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये जयवंत नानासाहेब दिघे, भीमराज दाजीबा दिघे,जनार्दन बाळाजी दिघे, विठ्ठल शिवराम शिंदे, जयराम भगवंत दिघे,शहाजी सुखदेव दिघे ,नंदकुमार भिकाजी दिघे, निलेश साहेबराव दिघे, रमेश वसंत गागरे, रवींद्र तबाजी दिघे, यशवंत राधाकृष्ण दिघे, बाबासाहेब तुकाराम शेवाळे, सचिन बबन दिघे, शिवाजी नामदेव दिघे,बाळासाहेब रखमा दिघे , संदीप निवृत्ती शिंदे, राजेंद्र राधाकिसन दिघे, किसन आनंदराव दिघे,प्रशांत शामराव दिघे, अंबादास त्रिंबक दिघे ,रविंद्र पोपट दिघे , निलेश दिनकर दिघे, भगवान हनुमान लांडे, बापू शंकर दिघे, अमोल राजेंद्र दिघे आदींच्या निवडी करण्यात आल्या यावेळी ग्रामस्थांच्या व गावच्या वतीने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक श्री किरण सुधाकर दिघे यांचा सत्कार माजी पोलीस पाटील रंगनाथ भिकाजी दिघे यांनी केला तसेच ग्रामस्थांनी नूतन धनेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ सदस्यांचे सत्कार केले. यावेळी ग्रामपंचायत चे अधिकारी वर्पे साहेब, संजय शिंदे, विजय अल्लट हे उपस्थित होते.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा