अहिल्यानगर मराठी न्युज : शहाजी दिघे
सोनगाव : राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा १५ जून रोजी वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, नुकतीच अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली आणि त्यामध्ये १७० नागरीकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे विखे पाटील यांनी यावर्षी वाढदिवसानिमित्त कोणताही आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेत कार्यकर्त्याना देखील तेचं आवाहन केले होते.
या आवाहानाचे राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोशीत सामाजिक कार्यात आग्रेसर असलेल्या द्वारकामाई फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी पालन करत कोणताही अनावश्यक खर्च न करता शालेय विद्यार्थ्याना ६६ डझन वह्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान शनिवारी सकाळी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी फाउंडेशनच्या सुत्य उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्यामुळे कार्यकर्त्याचा उत्साह दुणावल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.