अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
लोणी: श्री वरदविनायक सेवाधाम, लोणी- निर्मळ पिंप्री रोड, लोणी खुर्द (ता. राहाता) येथे आज दि. १२ ऑगस्ट रोजी आंगारकी चतुर्थी कार्यक्रमाचे आयोजन दिवसभरात करण्यात आले असल्याची माहीती श्री वरदविनायक सेवाधामचे संस्थापक महंत उध्दव महाराज मंडलिक यांनी दिली.
आज दिवसभरात जवळपासच्या गावातून वारकरी, भजनी मंडळे पायी वारी करीत दिंड्या घेवून लोणी येथील श्री वरद विनायक सेवाधाम येथे या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार
आहेत. सायं. ६ वाजेपर्यंत या सर्व दिंड्या येथे उपस्थित होणार आहेत. त्याचबरोबर सकाळपासूनच येथील श्री वरद विनायक मंदिरामध्ये भाविकांची दर्शन व अभिषेक अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी दिवसभरातून १० ते १५ हजार भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. सायंकाळी ४ वाजेनंतर महाप्रसाद देखील भाविकांना देण्यात येणार आहे. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तन होईल आणि महाप्रसादाचे वाटप होईल. तरी भाविकांनी उपस्थित राहावे, असे अवाहन श्री वरदविनायक परिवारातर्फे करण्यात आले आहे.