अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
लोणी प्रतिनिधी : भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने व पुणे येथील बुधराणी हास्पिटल व डॉ. काळे हॉस्पिटल बेलापूर यांच्या सहकार्याने आज (दि. १३ ऑगस्ट) रोजी १०१ व्या मोतिबिंदू व नेञ तपासणी शिबिराचे धनश्री विखे पा. यांचे प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिषदचे माजी सदस्य शरद नवले यांचे अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी उपसभापतीअभिषेक खंडागळे यांनी दिली.बागवान ,प्रियंका कुऱ्हे व भागवत प्रतिष्ठान,
स्वस्तिक ग्रुप पुणे येथील बुधराणी हास्पिटलच्यावतीने सन २०१६ पासून मोफत मोतिबिंदू, नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया व उपचार शिबीराचे आयोजन केले जाते. सरपंच मिनाताई साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, भाजपचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे ग्रामपंचायत सदस्य स्वाती अमोलिक, मुश्ताक शेख, तबसुम,उज्वला
कुताळ, सुशिलाबाई पवार, वैभव कुऱ्हे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
सदर शिबिराचा लाभ घेणेसाठी भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे, डॉ. सुधीर काळे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.