September 19, 2025 10:29 pm

लोणी बसस्थानकाच्या स्वच्छतेचे रायगड विभाग कमिटीचे कौतुक

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

लोणी (प्रतिनिधी) – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत आज दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी रायगड विभागाचे विभाग नियंत्रक श्री. दिपक घोडे व यंत्र अभियंता श्री. सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कमिटीने लोणी बसस्थानकाला भेट देऊन सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणादरम्यान बस आगार परिसराची स्वच्छता, सुंदररित्या राखलेले गार्डन, तसेच प्रवासी व परिसरातील शिस्तबद्ध व्यवस्था पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कमिटीने लोणी बस आगाराच्या कामकाज व देखभालीबाबत विशेष कौतुक नोंदवले.

या प्रसंगी लोणी ग्रामपंचायत उपसरपंच अनिल नानासाहेब विखे, सी एम विखे, माजी सरपंच बनसोडे साहेब, सिनेट सदस्य श्री. अनिल विखे, लोणी कामगार सोसायटीचे चेअरमन श्री किशोर धावणे, श्री. भाऊसाहेब विखे, श्री. राहुल धावणे, श्री. राजेंद्र मते, पत्रकार शंकर सोनवणे, ज्ञानेश्वर साबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच संगमनेर, विभागातील वाहतूक निरीक्षक श्री. राजेंद्र खंडीझोड, वाहतूक नियंत्रक श्री. रावसाहेब पर्वत व श्री. गजाकस यांनी देखील उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. लोणी बसस्थानकाच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या कामामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखद वातावरण लाभत असून, हे अभियान इतर आगारांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें