अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
लोणी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषि महाविद्यालय, अमृतनगर नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र विद्यालयाचा मुलांचा संघ उपविजेता ठरलेला आहे. या स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत १० जिल्हातील ३० महाविद्यालयातील एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या या उपविजेता संघामध्ये पुष्कराज पवार, आदित्य शिरसाठ, राहुल खडसे, तेजस साखरे व गणेश शेटे आदी खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धकांचा संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव
कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप महाले, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आशिष क्षीरसागर व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चंद्रकला सोनवणे आदी उपस्थित होते. उपविजेत्या संघाला क्रीडा शिक्षक प्रा. सिताराम वरखड यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. मंत्री
आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक प्रा. डॉ. उत्तमराव कदम आदींनी अभिनंदन केले.