September 19, 2025 7:03 pm

गोदावरी बायोरिफायनरीज लि. मध्ये स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा

अहिल्यानगर मराठी न्यूज : प्रशांत टेके

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लि. मध्ये शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर डायरेक्टर श्री. सुहास गोडगे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. गोदावरी बायोरिफायनरीज लि. मधील सर्व सुरक्षा अधिकारी, सोमैया विद्या मंदिर साकरवाडी, लक्ष्मीवाडी व शारदा इंग्लिश मेडियम स्कूल कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक व शिस्तबद्द संचलन करून मानवंदना दिली. 

देशाला स्वातंत्र्य मिळालेचा आनंद प्रत्येक भारतीयाने साजरा केला पाहिजे. स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक हुतातम्यांनी आल्या प्राणाची आहोती दिली. त्यांच्या त्यागाला ,आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अभिवादन आपण केले पाहिजे. असे आवाहन श्री. सुहास गोडगे यांनी उपस्थितांना केले. यावेळी कारखान्याचे मुख्य तांत्रिकी अधिकारी श्री. प्रवीण विभूते यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाचे महत्व सांगून शुभेच्छा दिल्या.  

स्वातंत्र्य दिनानिमित्त इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सोमैया विद्या मंदिर साकरवाडी, लक्ष्मीवाडी व शारदा इंग्लिश मेडियम स्कूल कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, गाणे, नाटक आणि शालेय विद्यार्थ्यांमधील भाषणे देखील समाविष्ट होती. या कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सर्व कामगार, अधिकारी, पंचकृशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री. गणेश पाटील यांनी केले तसेच कामगार अधिकारी श्री. संजय कऱ्हाळे यांनी आभार मानले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें